आला पावसाळा… पथ्य पाळा !

save hindu temples

दिवसाच्या प्रारंभी आले, सुंठ, गवती चहा घालून केलेल्या चहाने किंवा काढ्याने करावी.

जेवणात उकड काढून केलेली भाकरी किंवा भरपूर तूप घातलेली पोळी असावी. पालेभाज्या आणि उसळी टाळाव्यात. फळभाज्या खाव्यात.

पावसाळ्यात अग्नी मंद आणि बाहेर थंडावा असल्याने चमचमीत अन् मसालेदार पदार्थ खायची इच्छा होते अन् खाल्लेही जातात. हे पदार्थ पुष्कळ अतीप्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, हे बघावे.

व्यायाम कमीच करावा. साधारणपणे काखेत आणि कपाळावर थोडा घाम आला की, व्यायाम थांबवावा. पावसाळ्यात शारीरिक शक्ती न्यून असल्याने व्यायामाने वात अधिक वाढू शकतो.

अंगाला प्रतिदिन तेल लावावे. कोमट तीळ तेल उत्तम.